आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्याने आंदोलन चिघळलं आहे.
आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाजबांधवानी जळगावाच्या पहूर येथे रास्तारोको आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत. या सर्वांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे.गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडलं आहे. विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे.