दारूबंदीसाठी ऐतवडे बुद्रुक येथे अधिकाऱ्यांना निवेदन!

सद्या तरुणाई अनेक व्यसनाच्या आहारी गेलेली आपणाला पाहायला मिळते. ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथील दारूबंदी करण्यात यावी यासाठी सरपंच संदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन दिले.

गावात झालेल्या महिला व सर्व साधारण ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी दारूबंदी बाबत ठराव केला होता. ठराव करण्यापेक्षा दारूबंदीसाठी व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे होते. त्यामुळे गावात दारूबंदी करण्याच्या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.