तरूणाई ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहात असते त्या वैलेंटाईन वीकला कालपासून सुरूवात झालेली आहे. आज वैलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगण्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. तुम्हाला जर एखाद्या प्रिय व्यक्तीला लग्नाला मागणी घालायची असेल तर आजचा दिवस अत्यंत खास आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराला आज पुन्हा एकदा प्रपोज करून तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. त्यासाठी तुम्ही काही शुभेच्छा संदेशसुद्धा पाठवू शकता.
प्रपोज डे शुभेच्छा संदेश
नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुला सांगणार आहे…
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहीत नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…
Happy Propose Day!
समुद्राला किनाऱ्याची साथ
चंद्राला चांदण्यांची साथ
तू फक्त दे माझ्या हातात हात
मी देईन तुला जीवनभर साथ
Happy Propose Day!