केशरी कार्डवर धान्य मिळावे यासाठी वडगाव येथे मोर्चा

सध्या सरकार कडून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. अन्न सुरक्षा योजनेतून केशरी कार्डवर रेशन धान्य मिळावे या मागणीसाठी शहरातील कुटुंबीयांनी मोर्चा काढत मागणीचे निवेदन मंडल अधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर एकत्रित निवेदन कार्डधारक समितीच्या वतीने अपर तहसीलदार यांना देण्यात आले. येथील विठ्ठल मंदिरात केशरी रेशन कार्डधारक समितीच्या कार्डधारकांनी रेशनकार्डावरील व्यक्तीचे आधारकार्ड घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले होते.

हजारहून अधिक रेशनकार्डधारकांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठीचे प्रत्येकी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दोन अर्ज तयार करण्यात आले होते. सुरुवातीस संयोजक सुधाकर पिसे यांनी याबाबत माहिती सांगितली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करत मोर्चास सुरुवात झाली.

चावडीवर मंडल अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर पद्मा रोड वरून मोर्चा पालिकेवर आला. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी लोकसभा आचारसंहितेपूर्वी पालिकेत अन्न सुरक्षा योजनेतून रेशनवर धान्य मिळावे असा ठराव करावा, असे निवेदन उपस्थितांच्या वतीने देण्यात आले. यावेळी पालिकेसमोर मोठी गर्दी झाली होती.