गौडवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी महादेव (दादा) आलदर व उपाध्यक्षपदी दत्ता गुळीग

गौडवाडी ता. सांगोला येथील ग्रामसभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेमध्ये गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी महादेव (दादा) आलदर व उपाध्यक्षपदी दत्ता गुळीग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. लोकांच्या समस्या व त्यावरती लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असा ग्रामसभेत निर्धार केला. सर्व योजना व कामाचा आढावा वाचून ग्रामसभा संपन्न झाली.

ग्रामसभेनंतर पोपट दादा गडदे ग्रूपच्या वतीने नूतन तंटामुक्ती अध्यक्ष महादेव आलदर व दत्तराजे गुळीग यांचा सत्कार करण्यात आला. सदर निवड करण्यात आलेल्या तंटामुक्ती समितीचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे. ग्रामसभेला गावातील सर्व युवक वर्ग महिला, ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ आणि सर्व नेते मंडळी उपस्थित होते.