आमदार गणपत गायकवाडांसह पाच आरोपींना…..

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये (Hill Line Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची आज, 14 फेब्रुवारी पोलीस कोठडी संपली. आज त्यांना न्यायालयात हजर केले.

गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींचा   एमसीआर काढण्यात आला. कोर्टाने गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनवली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना उल्हासनगर चोपडा कोर्टात  हजर केले. त्यावेळी न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायाधीशांनाही पहाटेच न्यायालयामध्ये आणून ठेवण्यात आले होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. 

 सरकारी वकिलांनी गणपत गायकवाड यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्याला गणपत गायकवाड यांनी विरोध केला. दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपींना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर व रणजित यादव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.