आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान

८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस मध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टस मध्ये महिला दिनानिमित्त 8 दिवस आणि वर्षभरात इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस ऑनलाईन बुकींग केल्यानंतर या सवलतीचा घेता येणार आहे. विविध ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या महिला आणि त्यांच्या कुटूंबियांना या रिसॉर्टस मध्ये लाभ घेता येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नागपूरच्या पर्यटक निवास परिसरात
6 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. फॅशन शोचे आयोजन करण्यात आले असून यात महिलांना सहभागी होता येणार आहे.