बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार आहे. यावेळी एकूण नऊ हजार ९४३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी दिली. ४६ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, तर ५९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. राज्यपाल हे ऑनलाईन माध्यमातून या सोहळ्यासाठी जोडले जाणार आहेत. या समारंभास प्रख्यात निवृत्त प्राध्यापक तथा पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा आणि सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.