हातकणंगले येथे महाविद्यालयात १२ वी परिक्षांची बैठक व्यवस्था

उद्यापासून १२ वी परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी विध्यार्थी पालक तसेच महाविद्यालयात जोरदार तयारी सुरु आहे.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील केंद्र क्रमांक ५४६ वरती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे २१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान घेतल्या जाणाऱ्या १२ वी च्या परिक्षांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यानी परिक्षेला येताना ओळख पत्र व रिसिट घेऊन येणे बंधन कारक आहे तसेच कला वाणिज्य विज्ञान या तीन ही शाखाच्या पेपरांचे वेळापत्रक संबंधित महाविद्यालयांना व परिक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.