मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली! मराठा समाज आक्रमक

जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे जालन्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे.दोन दिवसांत जरांगे यांचे उपोषण सोडवा, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. जालन्यातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पाय मोर्चा काढण्यात आला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे . काल उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली होती. त्यांनी काल रात्री सलाईन लावलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. येणाऱ्या दोन दिवसात जरांगे यांच्या मागणीवर तोडगा निघाला नाही, तर सकल मराठा समाज रस्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.