हुपरीतील लाच घेताना सहाय्यक फौजदार जाळ्यात

हुपरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्यातील सहा. फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे दिलीप तिवडे रा. प्लॅट नं. ५०१, एच. आर. ५ कदमवाडी पल सरस्वती हॉस्पिटल जवळ कोल्हापूर असे त्याचे नाव आहे या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार यांचे त्यांच्या शेजारील कुटुंबाबरोबर पाळीव कुत्रे चावल्याच्या कारणावरून भांडण झाले होते याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात एकमेकांवर गुन्हे दाखल आहेत. याचा तपास सहा फौजदार तिवडे यांच्याकडे होता. यामध्ये तकारदार व त्यांचे मुलावर दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहा. फौ. तिवडे यांनी गुन्हयात अटक न करणेसाठी व गुन्हयात मदत करतो असे सांगून त्यांचेकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ९ हजार रूपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते सापळा रचून आज त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिपत्याखाली उपअधिक्षक सरदार नाळे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री बापू – सादुके पोलीस निरीक्षक, श्री बंवरगेकर, श्रेपोसई, पोहे का. सुनिल घोसाळकर, पो.ना. सचिन पाटील, म.पोका पुनम गाढील, पोहेकॉ. सुरज अपराध, विष्णु गुरव अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे.