इचलकरंजीत उद्यापासून ११ केंद्रावर ९ हजार २२२ विद्यार्थी देणार परिक्षा!

उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजी शहर व परिसरातील विविध ११ केंद्रांवर नियोजन करण्यात आले -असून कला, वाणिज्य, शास्त्र आणि कौशल्य -शाखातील ९२२२ विद्यार्थी-विद्यार्थीनी परीक्षा देणार आहेत. यंदा दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अशी दोन केंद्र वाढविण्यात आली असल्याची माहिती इचलकरंजी कस्टडी प्रमुख शिवाजी बोरचाटे यांनी दिली.

इचलकरंजीत शहर व परिसरात उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये बारावीसाठी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तालुका शिक्षण मंडळ कार्यालयातून गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे परिरक्षक कार्यालय आहे. परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमनिहाय व विषयानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलती राहणार आहे. एक शाखा एक परीक्षा केंद्र बदलून प्रत्येक केंद्रावर कला, वाणिज्य, शास्त्र आणि किमान कौशल्य शाखेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठी पथकासह महसूल, पोलिस यासह इतर खाते पथकांचीही नजर असणार आहे.


निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय यंदाही कायम केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास १० मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. परीक्षेच्या वेळेतही बदल तसाच राहील. प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत होणार आहे. सहायक परिरक्षकांच्या जबाबदारीखाली प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे.


ज्युनिअर कॉलेज हुपरी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ज्युनिअर कॉलेज हातकणंगले, श्री बालाजी माध्यमिक विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, तात्यासाहेब मुसळे विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, शरद सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेज यड्राव, दि न्यू हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ही केंद्रे सज्ज झाली आहेत.