आजपासून कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी!

सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा : कोयना धरणातून जादा ५०० क्युसेक्स पाणी सोडलेकोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे अभ्यासपूर्ण भूमिका आज (दि.२०) मांडली.

जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी कोयना धरणातून जादा ५०० क्युसेस पाणी सोडण्याची मागणी बाबर यांनी केली. त्यावर मंत्री देसाई यांनी कोयना धरणातून जादा ५०० क्यूसेस तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले.

आज दुपारपासूनच कोयनेतून पाणी सोडण्यात आले आहे, असे बाबर यांनी सांगितले.सुहास बाबर म्हणाले की, सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनांसाठी कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडले जाते.

कोयना धरण या योजनांसाठी व पर्यायाने या भागासाठी वरदान ठरले आहे. सध्या या योजनांचे आवर्तन सुरु असून कमी पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होत आहे. सध्या कोयना धरणातून २ हजार १०० क्युसेक पाणी सोडले जाते.