छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी १९फेब्रुवारी रोजी जयंती. या जयंतीनिमित्त सांगलीसह जिल्हाभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध मंडळांच्यावतीने यंदा विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, स्पर्धांचे आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी शिवजयंती उत्साहात तसेच शांततामय वातावरणात साजरी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.