कोल्हापुरातून लोकसभेसाठी शाहू महाराज निश्चित

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.चर्चेत उमेदवारीविषयी निर्णय झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केले आहे. स्वतः शाहू महाराज यांनी याबाबत अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी केलेल्या सविस्तर चर्चा या शाहू महाराज यांच्या उमेदवारीला बळकटी देणार्‍या आहेत.