पेठवडगावच्या पायल माळी हिला जलतरण स्पर्धेत कांस्यपदक!

बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 200 मीटर फ्री स्टाइल, 100 मीटर बॅकस्ट्रोक, 800 मीटर फ्री स्टाइल याबरोबर चार बाय शंभर रीले मध्ये वडगावच्या पायल रोहित माळी हिने यश संपादन करून कास्यपदक पटकावले आहे. ती संजय घोडावत इन्स्टिट्यूटची अकरावीची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक निवास साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

.