जयंतरावांचे सुपुत्र करताहेत लोकसभेची तयारी

मागील आठवड्यात जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगल्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पुन्हा कामाला लागले आहेत. जयंतरावांनी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचे स्पष्ट केले होते.त्यानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात ‘समृद्ध भूमी’ अभियान हातात घेतले आहे.

या माध्यमातून क्षारपड जमीन सुधारणा उपक्रम राबविण्यास सुरुवात करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक पाटील हे कामाला लागले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.