टेंभू योजना पाणी प्रश्नाच्या……

सांगोला हा तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई देखील खूपच जाणवते. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त आठ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे.

सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच टेंभू, म्हैसाळ योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे आणि याच पाठपुराव्याला यश आलेले आहे.

विस्तारित टेंभू योजनेच्या कामाची 753 कोटी ७९ लाख रुपयांची निविदा शासनाने काढली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.