शहरातील रस्त्यांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करत शहरभर डिजिटल फलक लावून जिल्ह्याच्या राजकारणात येण्याचे संकेत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे पुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी दिले आहेत.२५ तारीख, २५ कोटी आणि २५ वा वाढदिवस अशी ‘थीम’ घेऊन लागलेल्या या फलकांची शहरात चर्चा आहे.दरम्यान, या फलकबाजीवरून कृष्णराज हे विधानसभा लढवणार की अन्य कोणती निवडणूक (Assembly Elections) लढवणार याविषयी उत्सुकता आहे. कोल्हापूर उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघातून ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता यावरून वर्तवली जात आहे.
Related Posts
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले
शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. आज पहाटे 5 वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा…
उद्यापासून ‘शिवगर्जना’ महानाट्याचे नागरिकांसाठी मोफत आयोजन!
कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर उद्या दिनांक १३ ते १५ जानेवारी दरम्यान शिवरायांवरील ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात…
कोल्हापूर, सांगलीला महापुराची कल्पना आधीच मिळणार..
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी मित्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रातील निती आयोगाप्रमाणे राज्या मित्रा…