जर तुम्हाला तुमचे पैसे दीर्घ कालावधीसाठी गुंतवायचे असतील. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. सार्वजनिक पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असे या योजनेचे नाव आहे. सरकारची ही योजना देशात चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक लोक आपली बचत येथे गुंतवत आहेत.
सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळत आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम 15 वर्षांनी मॅच्युर होते. 15 वर्षांनंतर तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षांसाठी वाढवू शकता. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात किमान 500 गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक आधारावर 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हालाही या योजनेत 10,000 रुपये गुंतवून 32.54 लाख रुपये कमवायचे असल्यास, सर्वात आधी तुम्हाला या योजनेत तुमचे खाते उघडावे लागेल.
खाते उघडल्यानंतर तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये वाचवावे लागतील आणि वार्षिक 1 लाख 20 हजार रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक एकूण 15 वर्षांसाठी करावी लागेल.
सध्याच्या व्याजदराच्या आधारे गणना केल्यास, 15 वर्षांनंतर मुदतपूर्तीच्या वेळी तुमच्याकडे एकूण 32,54,567 रुपये असतील. या पैशाच्या मदतीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगू शकाल.