हुपरीत अंबाबाई यात्रेला सुरूवात

हुपरी शहराची वरदायिनी श्री अंबाबाई देवीची यात्रेची लगबग सुरू झाली आहे. यात्रेच्या पूर्व संध्येला मंडप पूजा झाली. शनिवारी पहाटे सासन काठ्यांच्या आगमनाने धार्मिक वातावरणात पाहिली पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. अंबाबाईच्या नांवान चांगभलंच्या गजरात वाजत गाजत देवीची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.रस्ते फुलांच्या पाकळ्या व रांगोळीने सजले होते.शुक्रवार पहाटे शनिवारी २ तारखेला हुपरी येथील मानकरी, पाटील, नाईक, कुंभार, माळी, तेली, परीट, कांबळे, व या गावचे मानकरी पाटील यांच्या चंदूर, शमनेवाडी कबनूर माणकापूर आदी सर्व मानाच्या सासणकाठ्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाजारपेठेतील हुतात्मा चिटणीस चौकात आगमन झाले.

पानविडा व श्रीफळ देऊन भेटीचा उत्सव व गळाभेट होऊन गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली. अंबाबाईच्या नांवाने चांगभलंच्या गजरात वाजत गाजत पहिल्या पालखीचे मिरवणुकीने मंदिरात आगमन झाले. यावेळी मानकरी पाटील, यात्रा कमेटी १२ बलुतेदार यांच्यासह सेवेकरी आपा- आपली सेवा बजावत होते. देवीच्या पालखीसमोर गोंधळी सुदर्शन खाडे अरविंद गोंधळी, रवि गोंधळी विकास बहाद्दूरे आदीसह गोंधळी बांधव देवीचे गुणगान गात होते.
उत्साहात सासनकाट्या पालखी समोर नाचविल्या जात होत्या नजरेचे पारणे फेडणारा हा उत्सव पहाण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रुढी-परंपरेने चालत आलेल्या धार्मिक कार्यक्रम सुरू असून पाळणे-वाले, खेळणे-वाले, किरकोळ विक्रेते यासह विविध प्रकारचे स्टॉल्स नाना विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे तर फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर वेढा पडला आहे. एकंदरीत भव्य दिव्य स्वरुपात यात्रेला प्रारंभ झाला असून रविवारी भरयात्रा तर सोमवारी निकाली कुस्त्यांचे जंगी आयोजन केले आहे. हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस इन्स्पेक्टर लिंगाप्पा चौखंडे यांनी बंदोबस्त ठेवून कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली आहे.