मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सोलापुरातील गावकरी आक्रमक…..

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुद्यावरून सोलापुरातील (Solapur News) कोंडी ग्रामस्थांनी सामूहिक शपथ घेतली आहे. मराठ्यांचा छळ करणारे राज्यकर्ते जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तोपर्यंत भाजपला सहकार्य नाही, अशी भूमिका कोंडी ग्रामस्थांनी घेतली आहे. भाजपसह त्यांचे मित्रपक्ष आणि पक्षातील कोणत्याही नेत्यांना कोंडी ग्रामस्थ सहकार्य तसेच मतदान करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.  कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून मराठा बांधवानी शपथ घेत भाजपला मदत न करण्याचा निर्धार केला. कोणतीही निवडणूक असूदे प्रचाराची गाडी गावात आल्यास मदत करणार नाही, मराठा समाज भाजपला मदत करणार नाही, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.