तुंबळ हाणामारीत दोघजण जखमी!

हाणामारीच्या प्रकरणात खूपच वाढ अलीकडच्या काळात होत आहे. लहान सहान कारणातून भरपूर वादविवाद हे होतच असतात. त्याचे मग रौद्र रूप धरण होते. पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथील विनयभंग व हाणामारी प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. शेजारी रहाणाऱ्या कुटुंबातील हा वाद आहे. चौगुले दारात उभे असता अचानक स्वामी नामक चार आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली यातून तुंबळ हाणामारी झाली.

हाणामारीत लोखंडी रॉड व हातोड्याचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून चार आरोपी विरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.फिर्यादी दारात उभे होते यावेळी आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तेव्हा असे का ? करता म्हणून विचारत असताना संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली यातील दोन आरोपींनी रागाच्या भरात लोखंडी रॉड व लोखंडी हातोड्याने मारहाण केली.

यामध्ये समुद्र चौगुले व सुरेंद्र चौगुले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला इजा झाली आहे. समुद्र विलास चौगुले (वय ३४ रा. चौगुले मळा पट्टणकोडोली) यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण स्वामी, अनिल व निखिल स्वामी यांच्या विरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही बाजूकडून परस्परांविरोधी गुन्हे दाखल झाले असून आता तपासाअंती काय निष्पन्न होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.