कोरोची गावचे जागृत ग्रामदैवत श्री मारुती देव व महाशिवरात्र यात्रा लंगरि साहेब उरूसास मोठ्या उत्साहात आतषबाजीने सुरुवात करण्यात आली व ग्रामदैवत मारुती प्रकाश कांबळे व युवराज कांबळे यांच्या कडून सात किलोची गदा अर्पण करण्यात आली. कोरोची गावचे जागृत ग्रामदैवत श्री मारुती देव यात्रेनिमित्त महाभिषेक सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आहे.जागृत महादेवास उपसरपंच विकी माने यांच्या हस्ते महा अभिषेक घालून महाआरती करण्यात आली व भव्य आतषबाजी करून महाशिवरात्रि यात्रा व उरुसास सुरुवात करण्यात आली.
आज शनिवार यात्रेचा मुख्य दिवस असून गावकऱ्यांच्या वतीने गावातील सर्व देवास गोडा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे,
पाच वाजता ऊस गाड्याच्या मिरवणुकी व ऊस लुटणे कार्यक्रम आणि सात वाजता लंगरी साहेब पिरास गंध चढविणे व रात्री नऊ वाजता ग्रामदैवत मारुती पालखी नगर प्रदक्षिणा व रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे व पहाटे पाच वाजता पालखी नगर प्रदक्षिणा करून नारळ फोडण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उद्या रविवारी सकाळी दहा वाजता श्री सिद्धेश्वर गुरु महाराज यांना साखर अर्पण करणे आणि दुपारी तीन वाजता निकाली कुस्तीचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. रात्री सात वाजता लंगडी साहेब गलीफ चढवने, रात्री दहा वाजता ऑर्केस्ट्रा होणार आहेत.
