आटपाडी येथे आगारासमोर एस. टी. कामगारांनी निदर्शने करून राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी केली. एस. टी. कामगारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी रखडल्या आहेत. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील देय थकबाकी द्यावी. २०१८ मधील महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, महागाई भत्ता वाढवावा, भविष्य निर्वाह निधीतून उचल मिळावी, प्रवासी भाडेवाढ ५ रुपयांच्या पटीत करावी, कोरोना कालावधीतील रजेचे अर्ज रद्द करून लॉकडाऊन हजेरी लावून त्यांची रजा त्यांच्या खात्यावर वर्ग करावी, वर्कशॉपमध्ये कर्मचारी वाढवून, स्पेअर पार्टस्ची पूर्तता करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी प्रवीण देशमुख, नागराज वाघमारे, बाबुराव गायकवाड, अमोल गायकवाड, नंदकुमार थोरात, निवास गायकवाड, हनुमंत देशमुख, सूर्यकांत जाधव, हनुमंत मोरे, सुधाकर देशमुख, आनंद लेंगरे, दत्ता पुजारी बाळासाहेब नवले, सुनील गायकवाड, आबा सागर, अमोल गायकवाड, सुधीर देशपांडे, नाना मोटे, लक्ष्मण कदम आंदोलनात सहभागी झाले होते.