सध्या प्रत्येकालाच कर्जाची गरज ही भासते आणि कर्जापोटी अनेक फसवणुकीला बळी देखील अनेक जण पडत आहेत. अशाच एका अमिषाला बळी पडून चक्क 2.39 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. गृह कर्जाच्याआमिषाने दोन लाख 39 हजार रुपयांची फसवणूक करणारे अजिंक्य लक्ष्मण काजवे व अद्विका अजिंक्य काजवे राहणार हुपरी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी ग्रह कर्ज देण्यासाठी महिले कडून सोन्याचे दागिने घेत स्वतःच्या नावावर तारण ठेवले तर दुसऱ्याकडून रोख पैसे घेतले. मात्र कर्जही मंजूर झाले नाही आणि मंजुरी करता दिलेले पैसेही परत दिले नाहीत.
याबाबतची फिर्याद बाबासो दिनकर हवालदार राहणार चंदुर यांनी पोलिसात दिली आहे. फसवणूक केल्याच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील अजिंक्य काजवे याला अटक करण्यात आली आहे.