हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या २८३ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी प्रदीप उबाळे यांनी दिली. इस्लामपूर मतदारसंघात या निवडणुकीसाठी १ लाख ३७ हजार ९४५ पुरुष तर १ लाख ३३ हजार ४७५ स्त्री मतदार आहेत. तसेच तृतीय पंथीय मतदारांची संख्या ५ असून एकूण २ लाख ७१ हजार ४२५ इतकी मतदार संख्या आहे.
या निवडणुकीकरिता प्रत्येक मतदान केंद्रासाठी २८४ केंद्र स्तरीय अधिकारी तसेच ३० क्षेत्रीय अधिकारी आणि १४२० कर्मचारी असा १५६२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मतदानादिवशी तैनात केला जाणार आहे. ३५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेचे काम पाहणार आहेत. मतदारसंघातील शहरी भागात ८७ आणि ग्रामीण भागात १९७ अशी एकूण मतदार केंद्रांची संख्या २८४ इतकी आहे. २८ ते ३० एप्रिल या कालावधीत येथील शासकीय गोदामात सर्व मतदान होतील.