उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही तिच्या अतरंगी फॅनशनं अनेकांचे लक्ष वेधत असते. उर्फी ही विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिची फॅन फॉलोइंग देखील जास्त आहे. अशताच आता उर्फी ही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. उर्फी कोणत्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे? जाणून घेऊयात…2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिक्वेलमधून उर्फी जावेद ही बलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रेम आणि वेडेपणाची कथा मांडण्यात आली होती. आता ‘लव्ह सेक्स और धोखा 2’ या चित्रपटात आजच्या पिढीची कथा मांडण्यात येणार आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया याबद्दल देखील या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
लव्ह सेक्स और धोखा 2 या चित्रपटात आजच्या जगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचे असणारे वर्चस्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तुषार कपूर आणि मौनी रॉय यांचा कॅमिओ या चित्रपटात असणार आहे, असंही म्हटलं जात आहे. तसेच उर्फी जावेद या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.
उर्फी जावेद तिच्या अतरंगी लूकमुळे किंवा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उर्फी जावेदला बऱ्याच दिवस बोल्ड आणि अतरंगी लूकमध्ये पाहिलं आहे, पण आता तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.