शक्तीपीठ महामार्ग विरोधातील १९ मार्च रोजीचे रास्ता रोको आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून, ते २८ मार्चनंतर केले जाणार आहे. अशी माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
साजणी (ता. हातकणंगले) येथे शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील महामार्ग प्रभावित गावातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात १९ मार्चला रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, समितीने ते २८ मार्चनंतर करण्याचे ठरविले आहे.
शासनाने गॅझेट नोटिफिकेशनवर शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्याचे आवाहन केले आहे.त्याची मुदत २८ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी जागृती व मदत करण्याचे अभियान सुरू आहे. त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंदोलन पुढे ढकलले आहे. त्याची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.