आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कोणत्याही दिवसात आचारसंहिता लागू शकते. विधानसभा निवडणुकांसाठी सभा, मे, विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक मतदारसंघात आपापल्या पक्षांकडून करण्यात येत आहे. उमेदवारी बाबतीत मात्र अजूनही तर तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अशातच हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भास्कर शेटे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश बापट यांनी हा प्रवेश दिलेला आहे. हा प्रवेश होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचा देखील पुढाकार होता असे बोलले जात आहे. या नव्या राजकारणामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष साजरा झाला. शेटे यांनी यापूर्वी या हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढण्यास मदत मात्र नक्कीच होणार आहे.