सुळकूड योजनेप्रश्नी कृती समितीची हरकत दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झालेल्या बैठकीमध्ये सुळकूड योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्‍ज्ञांचा अहवाल पाठवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीतर्फे सूचना व हरकत दाखल केली. प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडे ही हरकत दाखल केली आहे.
सुळकूड योजना अत्यावश्यक आहे याची माहिती व तपशील यामध्ये दिलेला आहे.

त्याचबरोबर योजनेवर आक्षेप घेणाऱ्यांच्या सर्व आक्षेपांचे खंडन करण्यासाठी अधिक म्हणणे २६ मार्चपूर्वी दाखल करण्यात येईल, असे कळवले आहे. हरकत दाखल करताना कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, पुंडलिक जाधव, सदा मलाबादे, अभिजित पटवा, नागेश शेजाळे उपस्‍थित होते.