इचलकरंजी शहरातील पाण्याचा प्रश्न तर सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. अशातच शहरातील अवजड वाहतूक जोमाने सुरू असलेली पाहावयास आपल्याला भेटत आहे. तर इचलकरंजी शहरातील राजवाडा चौक ते नदीवेस नाका या वरदविनायक रोडवरील अवजड वाहतुकीला बंदी घालावी अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
येथील रस्ता हा खूपच अरुंद आहे आणि यातच व्यावसायिकांच्या गाड्या या रस्त्यावरच उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीस खूप मोठा अडथळा निर्माण होतो. याचा वाहनधारकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागतो. तसेच अनेक अपघात देखील होत राहतात. त्यामुळे अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे आहे.