बापूसाहेब पाटील संस्था समूहातील सभासदांना फरक बिलाचे वाटप

अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील सभासदांना दीपावलीनिमित्त फरक बिल व भेटवस्तूचे वाटप समूहाचे अध्यक्ष अॅड. राजवर्धन पाटील, दूध संस्थेचे उपाध्यक्ष महादेव सूर्यवंशी, विमल दूध संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील यांच्याहस्ते केले.

बापूसाहेब पाटील दूध संस्था व विमल पाटील महिला सहकारी संस्थेस दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना फरकबिलापोटी म्हशीसाठी प्रतिलिटर २ रुपये २० पैसे व गायीसाठी प्रतिलिटर १ रुपये व भेटवस्तू, कर्मचाऱ्यांना १६.६६ टक्के बोनस असे ७ लाख ७५ हजार १७५ रुपयांचे वाटप केले. सुरेश बापूसाहेब पाटील अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना भेटवस्तू दिली. विमल सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, सुदाम पाटील, दादासाहेब पाटील, वसंत पाटील, राजेंद्र कानडे, नीता माळी, शोभा पाटील, काशिलिंग वाघमोडे आदी उपस्थित होते.