महाविकास आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा की……

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीने स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा गुरुवारी 21 तारखेला होण्याची शक्‍यता आहे. हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाने उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. त्यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, या भूमिकेवर राजू शेट्टी आजपर्यंत ठाम आहेत. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा शेट्टी यांनी भेट घेतली आहे.महाविकास आघाडीत दाखल न होता आघाडीने हातकणंगलेत स्वाभिमानीला पाठिंबा द्यावा, राज्यात महाविकास आघाडीला स्वाभिमानीकडून पाठिंबा मिळेल, अशी चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे.