सध्या सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने नागरिक त्रस्त झालेले आहेत. ताप, खोकला, सर्दी यामुळे दवाखाने फुल्ल झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच डेंग्यूचा प्रभाव देखील खूपच वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे.
हेरले येथे प्रभाग सहा मध्ये दोन डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून नागरिकांचे प्रबोधन केलेले आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत गटारींची स्वच्छता करून पावडर फवारणी करण्यात आलेली आहे. धूर फवारनी देखील ग्रामपंचायतकडून करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य पथकामार्फत घरोघरी उघड्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळीनाशक टेमीफोस औषध टाकून पाण्यात अळी दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. तसेच नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.
