सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि इचलकरंजी शहराला पाण्याची टंचाई देखील वरचेवर जाणवतच राहते. महानगरपालिकेकडून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी बदलणे तसेच सीईटीपी प्रकल्पाचे काम सुरू आहे. जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊन शहरास अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता होत राहते.
शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा योजनेची नवीन जलवाहिनी बदलणे ही बाब विचारात घेऊन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बौद्धविहार टाकवडे रोड येथे जलवाहिनी बदलणे तसेच सीईटीपी प्लांट बांधणे या दोन्ही कामांची भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांनी संबंधित मक्तेदार यांना सदरची कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना ही दिलेल्या आहेत.