लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. या रणधुमाळीत परीक्षा आणि लग्न समारंभही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते विविध पद्धतीने त्यांचा प्रचार करत आहेत. तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. तेलंगणा आणि मध्य प्रदेशात लग्नपत्रिकेतून अनोखी मागणी करण्यात आली आहे. लग्नात आहेर आणू नका, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करा. 2019 निवडणुकी मोदी लहर होती.
पण 2024 मध्ये सुनामी आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे, असा मेसेज लग्नपत्रिकेत लिहिला आहे. नंदिकंती नरसिमलू आणि त्यांची पत्नी नंदिकंती निर्मला यांचा मुलगा साई कुमार यांचे 4 एप्रिल रोजी लग्न आहे. साई कुमारचे लग्न महिमा रानी हिच्याशी होत आहे. लाकडपासून तयार झालेल्या वस्तूंचा व्यवसाय करणारे नरसिमलू यांनी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे.
त्या लग्नपत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांना मतदान करणे हेच आमच्यासाठी महत्वाचे गिफ्ट आहे. नरसिमलू यांच्या दोन मुलींचे यापूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी त्यांनी काही अपील केली नाही.