चंद्रहार पाटील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार की…..

 2024 लोकसभा निवडणुक पार पडली असून सर्वांनाच विधानसभेचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू असून मतदारसंघांवर दावे प्रतीदावे करण्यास सुरवात झाली आहे. अशातच शिवसेना (उबाठा) पक्ष सांगलीतून दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली.चंद्रहार पाटील यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, कोणत्याही मैदानात गेलो तरी आपलं काम प्रामाणिकपणे केलं की यश नक्की मिळत असतं. सांगलीमधून शिवसेना ठाकरे गट मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढवणार आहे.लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चंद्रहार पाटील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चंद्रहार पाटील यांनी उत्तर दिले की, पक्षाने मला जर काही आदेश दिला तर मी नक्कीच विचार करेन.