सांगली लोकसभा मतदार संघात पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची जाहीर सभेत आणि आता थेट यादीत घोषणा करून शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला दोनवेळा ‘ओव्हरटेक’ केले आहे.काँग्रेस अद्याप अंधारात चाचपडत आहे. या घडीला काँग्रेसची अवस्था ‘बाहुबली’सारखी होताना दिसते आहे आणि या खेळात ‘कटप्पा’ कोण आहे, याची चर्चादेखील जोर धरू लागली आहे.
आज महाविकास आघाडीतील जागावाटपात सांगलीचा तिढा एवढा वाढलाय की, काँग्रेस समर्थकांना प्रश्न पडलाय, शिवसेनेचा सांगलीसाठी एवढा हट्ट का? आणि या हट्टात कटप्पा कोण? बाहुबली सिनेमाच्या दुसऱ्या भागात काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
कदाचित, या रणातही मिळतील, उद्योगमंत्री उदय सामंत तसा ‘शब्द’ देऊन गेले आहेत. ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी का जाहीर केली, यामागचा डाव ते सांगणार आहेत. या वेगवान घडामोडींत शिवसेनेने काँग्रेसला तब्बल तीनवेळा ‘ओव्हरटेक’ केले आहे.