आळते येथे पोलिसांचे संचलन

हातकणंगले,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी आळते(Aalte) येथील प्रमुख मार्गावरून हातकणंगले पोलीस दलाच्या  वतीने रूट मार्च काढून शांततेचे आवाहन करण्यात आले.

 गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी आळते गावातील  तरुण मंडळांनी जोरदार तयारी चालु केली आहे. चालू वर्षी सामाजिक  उपक्रम राबवून समाज प्रबोधनात्मक व शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी गणराया ॲवॉर्ड देण्याची घोषणा केली आहे. त्याला प्रतिसाद देत मंडळांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी हातकणंगले  पोलीसांनी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्ग दर्शनाखाली शुक्रवारी  सायंकाळी आळते गावातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढून पोलीस  दलाचे संचलन केले. ग्रामपंचायत कार्यालया पासून या रूट मार्चला सुरुवात झाली. गणेशोत्सव साजरा करण्यात साठी प्रत्येक मंडळाने ग्रामपंचायतीचा नाहरकत घेऊन पोलीस ठाण्याचा परवाना काढावा असे  आवाहन पोलीस निरिक्षक शरद मेमाणे यांनी केले आहे.