रेल्वेसह अनेक विकासाची कामात अपयश…

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेला पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्गी लावण्यात केंद्रात राज्यात दहा वर्षे सत्ता असून देखील सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याने त्रस्त झालेल्या जनतेला सत्ता असुनही समस्या मार्गी न लागल्याने बदल हवा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी व्यक्त केले.सोलापूर लोकसभेची निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यात दुरंगी शिवाय दोन युवा आमदारांमध्ये होणार आहे.

त्यामध्ये भाजप उमेदवार आमदार राम सातपुते पाच वर्षाची कारकीर्द आणि आमदार प्रणिती शिंदे यांची पंधरा वर्षाची कारकीर्द यांचा देखील लेखाजोखा या निवडणुकीच्या दरम्यान मांडला जाणार आहे तत्पूर्वी काँग्रेसमधील काहीनी आ. राम सातपुते यांना उपरा म्हणून टीका केल्यानंतर त्या टिकेचा भाजपकडून समाचार घेत जिल्ह्यातील आमदार असताना उपरा कसा अशा पद्धतीने प्रत्युत्तर देखील दिले.