इस्लामपूर तांबवे (ता. वाळवा) येथील गावठाणातील कार्यालये व इतर अतिक्रमणे काढण्यासह मुलांसाठी अभ्यासिका आणि गाव कचरामुक्त व स्वच्छ करावा, या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते रतन पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. पाटील तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडे याबाबत पाठपुरावा करत आहेत. तरीही न्याय न मिळाल्याने ५ एप्रिल रोजी ते उपोषण करणार आहेत.
याबाबतचे निवेदन त्यांनी ग्रामविकास अधिकारी कुबेर कांबळे यांना दिले आहे. त्यांनी सांगितले, गावातील अतिक्रमणे दूर करून झाडे-झुडपे तसेच खड्डे मुजवून परिसर कचरामुक्त व स्वच्छ करावा अशा मागण्या केल्या आहेत. यावेळी शंकर तोडकर, मंगेश मोरे, गणेश पाटील, डॉ. संदीप निकम, अशोक मोरे, धोंडीराम जाधव उपस्थित होते.