श्री महालक्ष्मी वधू वर केंद्र हुपरी यांच्यावतीने मराठा सर्वधर्मीय वधू वर मेळावा उद्या रविवार 31 मार्च रोजी हुपरी येथील सपाटे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये जैन, लिंगायत, सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, गवळी, गुरव, परीट, रंगारी, न्हावी, महार, मांग, धनगर व मराठा उपजातीतील सर्व वधू-वरांची नोंदणी करून उमेदवारांचा परिचय करून देण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संभाजीराव शेटके, मनसे शहर प्रमुख दौलतराव पाटील, हुपरी उपनगराध्यक्ष गणेश वाईगडे, नगरसेवक सुभाषराव ससे आदी उपस्थित राहणार आहेत.