महापालिकेचा सार्वजनिक नळ घरात….

इचलकरंजी महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक नळ एकाच्या घरात आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्याने दिले. तर ही कारवाई होऊ नये, यासाठी एक स्थानिक नेता प्रयत्नशील होता. याची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती. इचलकरंजी शहरात मालमत्ताधारकांच्या तुलनेत सुमारे 20 हजारांच्या संख्येने नळ कनेक्शन कमी आहेत.

शहरातील काही भागात सार्वजनिक नळ घरात घेतल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. मनपा कर्मचाऱयांच्या दक्षतेमुळे शहरातील एका भागात असा प्रकार उघडकीस आला. तो तातडीने तोडावा म्हणून अधिकाऱयाने आदेश दिले. मात्र, यावेळी एका लोकप्रतिनिधीचा फोन आला. त्याने नळ तोडू नका, असे सांगितले.

मात्र, सार्वजनिक नळ घरात घेणे चुकीचे आहे. त्याने घरगुती नळासाठी अर्ज केल्यास त्यानुसार मंजुरी देऊ; पण सार्वजनिक नळ घरात घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका अधिकाऱयांनी घेतली. पत्रकारांसमोरच आज हा प्रकार पालिकेत घडला.