दारू विक्रेत्यावर कारवाई…

अलीकडच्या काळात अवैध्य व्यवसाय मोठ्या प्रमाणावर खुलेआम सुरु आहेत. कापूसखेड (ता. वाळवा)
येथील मसूद गल्लीत बेकायदेशीरपणे देशी दारू विकणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ हजार २०० रुपये किमतीच्या ५२ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. याबाबत पोलिस हवालदार अरुण सदाशिव कानडे यांनी दारू विक्रेता अनिल दिनकरराव पाटील (वय ४७, रा. कापूसखेड) याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सुरु आहे.