आमदार जयंत पाटील यांचा सांगलीचा स्कूल पॅटर्न बनणार ‘राज्यासाठी मॉडेल….

आमदार जयंत पाटील यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत. समाजाच्या दृष्टीने ते खूपच फायदेशीर आहेत. सांगलीत तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मॉडेल स्कूल मोहीम सुरू केली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यामार्फत जिल्हाभरात राबविली. सध्या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा कायापालट झाला आहे. भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे. ना. दादा भुसे या कामी लोकांचाही सहभाग घेतला आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात केली. जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली. सांगलीच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याने मंत्री भुसे यांनीही शिक्षण खात्याचा कार्यभार स्विकारताच हा निर्णय घेतला.

गायकवाड यांनी मॉडेलचे सादरीकरण त्यांच्यापुढे केले.डुडी सध्या साताऱ्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंत्री भुसे यांनी त्यांच्याकडूनही या उपक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर गायकवाड यांना या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी पाचारण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कुंभार कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी भुसे यांना या अभियानाची संपूर्ण माहिती दिली. राज्यभरात यापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या प्रयोगांची माहिती घेऊन गुणवत्तेचा पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करणार असल्याचे भुसे म्हणाले. शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करू असेही त्यांनी सांगितले.