इचलकरंजीत कारखान्यांची संख्या भरपूर आहे. अनेक परगावाहूनलोक या ठिकाणी रोजगारासाठी स्थायिकआहेत.
इचलकरंजीतील खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील एका सायझिंगला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत सायझिंगमधील सिलिंग जळून सुमारे २० लाखाचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसातून मिळालेली माहिती अशी, खंजिरे इंडस्ट्रीजमध्ये स्वदेशी सायर्झस नावाचा सायझिंग कारखाना आहे.
या ठिकाणी काल दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होवू कारखान्याच्या छताला आग लागली. पाहता पाहता आगीचा मोठा भडका उडत संपूर्ण सिलिंग भस्मसात झाले. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दोन अग्निशमन बंबाच्या साहाय्याने तासाभरात आगीवर नियंत्रण आणण्यात आले. आगीत कारखान्याचे फॉल सीलिंग, इलेक्ट्रिक वायर, टुबसेट, सुताचे कोन, वाफिंग मशीन जळून सुमारे २० लाखाचे नुकसान झाले आहे. विशाल वैभव बावण्णवर (वय ४०) यांच्या फिर्यादीनुसार या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.