उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर भडकले राजू शेट्टी…….

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आणखी चार मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे, यामध्ये हातकणंगले मतदारसंघाचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंनी सत्यजीत आबा पाटील यांना हातकणंगलेतून तिकीट दिलं आहे, यामुळे राजू शेट्टींची महाविकासआघाडीत जायची शक्यता मावळली आहे.

हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजू शेट्टी यांच्यासोबतची बोलणी फिस्कटली नाही, हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडचं राजकीय गणित पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार द्या. राजू शेट्टी यांना म्हणलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर राजू शेट्टींनी पलटवार केला आहे. ‘शिवसेनेने मशाल चिन्ह घेऊन लढण्यास सांगितलं, याचा अर्थ मी शिवसेनेत गेलो असा होतो, त्यामुळे मी त्याला नकार दिला.

भाजपविरोधात मतविभागणी टाळण्यासाठी मला पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती, मात्र याचं काय झालं माहिती नाही. त्यांनी थेट उमेदवार दिला. मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून स्वाभिमानी मधूनच निवडणूक लढणार’, असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.