रमझानच्या महिन्यात शेवयाप्रेमींना महागाईचा फटका……..

इस्लामी कालगणनेतील रमझान महिन्याला सुरुवात झाली असून यासाठी मोमिनपुऱ्यातील बाजारपेठही सज्ज झाली आहे. रमझानपूर्वी शेवयांचा बाजार सजला असला तरी यंदा महागाईचे सावट दिसत आहेत.खाद्यतेल, मैदा, कारागिरांची मजुरी, इंधन आणि तुपाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेवयांच्या दरात २० टक्के वाढ झालेली आहे.

भूजी बारीक शेवया, डबल फ्राय, बनारसी शेवयांना बाजारात मोठी मागणी आहे. रमझान सुरू होण्यापूर्वी मोमिनपुरा परिसरातील बाजारात शेवयांची दुकाने सजू लागतात. या काळातच विविध रंगांच्या अनेक प्रकारच्या शेवया बाजारात मिळतात. शहरातील पाच ते सहा ठिकाणी शेवया तयार करणारे कारखाने आहेत. त्यात दररोज मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या शेवया बनतात. मैदा, कारागिरांची मजुरी, तेल आणि तुपासह इतरही कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे रमझानच्या पार्श्वभूमीवर शेवळ्या आणि फेण्याच्या दरात २० टक्क्यांच्या जवळपास वाढ झालेली आहे. १३० ते १४० रुपये किलो असलेल्या डबल फ्राय शेवळ्या आणि इलाहाबादी शेवळ्या १६० रुपये तर साध्या शेवळ्या ६५ रुपयांवरून ८० रुपये किलो झालेल्या आहेत.