आटपाडी शहरातील विकासकामांमध्ये काम अडविण्याचा प्रयत्न सुरु : दत्तात्रय पाटील

दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर, विद्यमान आमदार सुहास (भैय्या) बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (अध्यक्ष) यांच्या माध्यमातुन आटपाडी नगरपंचायत क्षेत्राचा सर्वांगिण विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आटपाडीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणुन त्या निधीतून आटपाडीला शहराचे वेगळे रूप निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आटपाडीची नगरपंचायत निर्माण करण्यासह विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या नेतृत्त्वाने आणण्यासाठी कष्ट घेतले. रस्ते, वीज, आरोग्यासह अनेक प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी विविध माध्यमातुन प्रयत्न केले. आटपाडी शहरात आत्तापर्यंत नगरपंचायत इमारतीसाठी ४.५० कोटी, मुख्य पेठेतील रस्ता ४ कोटी, गदिमा नाट्यगृह १६ कोटी, पुर संरक्षक भिंत २ कोटी, शहरातील रस्ते कामांसाठी २५ कोटी, उपजिल्हा रूग्णालय २२ कोटी, पोलीस ठाणे इमारत ४ कोटी ५० लाख, पीडब्ल्यूडी कार्यालय १ कोटी, विश्रामगृह ७५ लाख, पांढरेवाडी रस्त्यावर पुल २.५० कोटी, तलाव सुशोभिकरण ३ कोटी, आटपाडी ते पांढरेवाडीमार्गे आंबेवाडी रस्ता ९ कोटी, आटपाडी एसटी स्टॅण्ड ५ कोटी, आटपाडी शहरासाठी पाणी योजना ८४ कोटी असा भरीव निधी आमच्या नेत्यांनी सरकारच्या माध्यमातुन लोकहितासाठी पाठपुरावा करून मंजुर करून आणला.

 आटपाडी शहरातील विकासकामांना निधी आणुन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असताना काही मंडळींनी विघ्न आणत आहेत. सध्या आटपाडीतील साई मंदिर ते पोलीस स्टेशन चौक या २० कोटीच्या रस्त्याचे काम सुरू असुन हे काम अडविण्याचा उद्योग झाला आहे. लोकांची गैरसोय करून कामे बंद पाडणाऱ्यांनी आधी गावासाठी निधी आणावा असे दत्तात्रय पाटील पंच यांनी म्हटले आहे. आटपाडीतील काही लोक कामे अडविण्यासाठी पुढाकार घेत असुन नागरिकांची गैरसोय करण्यासाठी ही धडपड सुरू आहे.